Ad will apear here
Next
‘पेले’ डॉक्युमेंटरी : ब्राझीलमधल्या एका कालपटाचा इतिहास


‘तो देशाचा विजय होता. तो (फुटबॉल या) खेळाचा विजय नव्हता...’ ‘पेले’ या नेटफ्लिक्सवरच्या डॉक्युमेंटरीमध्ये १३६३ गेम्समध्ये १२७९ गोल करणारा पेले स्वत: हे शेवटचं वाक्य म्हणतो. यामागचे संदर्भ ती डॉक्युमेंटरी पाहताना कळत जातात. 

१९५० साली वर्ल्ड कप हरल्यानंतर ब्राझीलनं १९७० सालच्या वर्ल्ड कपमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार असलेल्या पेलेच्या आयुष्यातल्या गेमबाबत वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांबद्दल या डॉक्युमेंटरीत माहिती मिळत जाते. खेळामागचं राजकारण सहसा समोर येत नाही; पण ते किती खोलवर रुजलेलं आहे ते यात पाहायला मिळू शकेल. 

आज वयाच्या ८०व्या वर्षी पेलेला गतकालाकडे पाहून काय वाटतं, ते या डॉक्युमेंटरीत दिसतं. काही वेळा तो कॅमेऱ्यासमोर चतुरपणे उत्तरं देतो; पण फुटबॉलचं जुनं फूटेज पाहायलाही मजा येते. तो स्वत: एका प्रसंगात आपलेच जुने गेम पाहतानाही दिसतो. 

ही डॉक्युमेंटरी म्हणजे केवळ पेलेचं आयुष्य नसून, ब्राझीलमधल्या एका कालपटाचा इतिहासही आहे. अमेरिकेच्या पाठिंब्यानं ब्राझीलमध्ये १९६४ साली उठाव झाला आणि मेडिची हा हुकूमशहा सत्तेवर आला. त्याच्याबद्दल भाष्य करताना या डॉक्युमेंटरीत येणारं ‘माणूस हा एकमेव प्राणी आहे, जो सत्ता प्राप्त झाल्यावर इतर माणसांचा छळ करून त्यांना मारून टाकतो...’ हे वाक्य त्रास देऊन जातं. (ट्रेलर सोबत दिला आहे.)

- नीलांबरी जोशी


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IUHSCW
Similar Posts
उत्खनन १९३९च्या मे महिन्यात उत्खनन करणारा बेसिल ब्राउन एडिथ प्रिटी या महिलेच्या ‘सफोक’ या इंग्लंडमधल्या परगण्यात खोदकाम करायला हजर होतो. पुरातत्त्वशास्त्रातलं आजतागायत अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलेलं एक उत्खनन तो करतो. ‘द डिग’ या नेटफ्लिक्सवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची ही मध्यवर्ती संकल्पना. हा चित्रपट
बाँबे रोझ : उत्कट भावस्वप्न मांडणारा अॅनिमेशनपट ‘मुंबई’ या गुलजारच्या कवितेतल्या ओळींसारख्या ‘बाँबे रोझ’ या (नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेल्या) अॅनिमेशनपटातल्या व्यक्तिरेखा प्रत्येक फ्रेममध्ये रंगांच्या छटा आणि भावच्छटा घेऊन साकार होत जातात.
असा प्रीतीचा नाद अनाहत..! चित्रपटाच्या शेवटी ‘पण हे सगळं करून तू आनंदात राहशील का’ या जेरीच्या प्रश्नावर शार्लोट म्हणते, ‘आपल्या दोघांनाच जाणवणारा आपल्यातल्या प्रेमाचा तो मंतरलेला प्रदेश आपल्यात जिवंत असताना, प्रेमाचा अनाहत नाद आपल्याला ऐकू येत असताना, फक्त आपल्या नजरेला दिसणारा चांदण्यांचा झिलमिलता प्रकाश समोर असताना आपण चंद्राची
वाटांसवें त्या पळालों सारें काहीं झुगारून...! अन्न, वस्त्र, निवारा या मूळ गरजा भागवणारा मानव उत्क्रांत होत गेला तशा दया, करुणा अशा उन्नत समजल्या जाणाऱ्या सकारात्मक भावना त्याच्यात रुजत/दृढ होत गेल्या. तसं इस्टवूडनं सुरुवातीच्या चित्रपटात गुन्हेगार, मग इन्स्पेक्टर आणि नंतर मानसिक गुंतागुंत जाणणारा, दया, करुणा, प्रेम आणि मदतीचा हात पुढे करणारा नायक रंगवला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language